Info
सर्व आदरणीय, श्रद्धावान धम्मेक उपासक, उपासिका सर्वांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो.
बहुजन हिताय ,बहुजन सुखाय हाच
बुद्धांच्या धम्माचा मुख्य उद्देश आहे .
बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी प्रत्येक धम्मेक भिक्षु ने समाज हितासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी
आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे. तथागतांनी भिक्खु साठी दिलेल्या 227
शिलाचे आचरण करून,सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित
केले पाहिजे. असे मला वाटते.
विशेष सूचना : यूट्यूब वर चॅनल चालवून धम्माचे उत्तम रीतीने , शील आचरण करून, प्रसार आणि प्रचार व्हावा हाच एक उद्देश आहे. भिक्खु ने पैशाचा धनाचा संचय करू नये आणि धन ,रूपये, पैसा याला स्पर्श करू नये असा तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू साठी दिलेले शील आणि विनय आहे.तथागतांनी भिक्खु ला दिलेल्या शीलाचे आणि विनयाचे निती नियमाने आदरपूर्वक पालन व्हावे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे समाजहिताचे तत्त्व निती-नियमात तत्पर ठेवून बहुजनांच्या कल्याणार्थ आम्ही दीन रात परिश्रम करीत आहोत. आपल्या मंगलमैत्रीने सफलते कडे जात आहोत.भवतू सब्ब मंगल सर्वांना खूप खूप साधुवाद
Tags
Stats
Joined Invalid Date
0 total views